मुलांना पक्ष्यांबद्दल किंवा निसर्गाबद्दल कुतूहल निर्माण व्हावे असे आपणांस वाटते का? यासाठी आपण योग्य अशा साहित्याच्या शोधात आहेत? तर मग आम्ही घेऊन आलो आहोत पक्ष्यांविषयीचे माहितीपूर्ण साहित्य आणि मनोरंजक खेळ! हे साहित्य शाळेत वर्गामध्ये किंवा वर्गाबाहेर, वैयक्तिक तसेच समूहाच्या वापरासाठी योग्य आहे. आपल्या उपयुक्ततेनुसार हे साहित्य आपण डाउनलोड करून याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
आम्ही मुलांना पक्ष्यांच्या दुनियेतून निसर्गाच्या जवळ आणण्यासाठी प्रयत्त्नशील आहोत. यासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य, कार्यशाळा आणि विविध उपक्रम राबवतो. हे शैक्षणिक साहित्य वापरून किंवा खरेदी करून तुम्ही या वाढत्या पक्षी आणि निसर्गशिक्षण समूहाचा भाग बानू शकता. त्याचप्रमाणे निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये देखील मोलाचा हातभार लावू शकता.
आपला अभिप्राय आमच्यासाठी मोलाचा आहे, तो आपण फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्यूब किंवा ई–मेल द्वारे कळवू शकता.

लघुमार्गदर्शिका
भारतातल्या विशिष्ट भागांमध्ये सहजपणे आढळणाऱ्या पक्ष्यांची यादी लघुमार्गदर्शिकेत करण्यात आली आहे. पक्ष्यांचे अधिवास, त्यांची वैशिष्ट्ये, सवयी यावरील चिन्हांकित माहिती संदर्भासाठी देण्यात आली आहे. वापरायला अतिशय सोप्पे असल्याने तसेच उत्तम प्रतीच्या लॅमिनेशनमुळे ह्या लघुमार्गदर्शिका पक्षिनिरीक्षणासाठी सोबत घेऊन जाता येतात. इंग्रजी आणि द्विभाषिक मार्गदर्शिका उपलब्ध आहेत- खरेदी करण्यासाठी किंवा ५० हुन अधिक प्रति सवलतीच्या दरात मिळवण्यासाठी संपर्क साधावा.

बर्ड सर्व्हायवर
मैदानी वातावरणात मुलांच्या गटासाठी आदर्श, हा खेळ कुठेही खेळला जाऊ शकतो आणि पक्षी असणे किती कठीण आहे याची झलक देते!

आपल्या सभोवतालचे पक्षी
भारतात अगदी सहजपणे दिसणाऱ्या पक्ष्यांची ओळख या भित्तीपत्रिकेतून करून देण्यात आली आहे. यातील पक्षी व त्यांची वैशिष्ट्ये तसेच प्रत्येक पक्ष्याच्या आवाजाबद्दल जाणून घेण्यासाठी हि दृकश्राव्य भित्तीपत्रिका अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. तसेच भिंतीवर लावण्यासाठी मोठ्या आकाराचे भित्तीपत्रक आपण विकत घेऊ शकता.

पाणथळीजवळचे पक्षी
ह्या भित्तीपत्रिकेतून पाणथळीच्या ठिकाणी दिसणाऱ्या पक्ष्यांची ओळख करून देण्यात आली आहे. यातील पक्षी व त्यांची वैशिष्ट्ये तसेच प्रत्येक पक्ष्याच्या आवाजाबद्दल जाणून घेण्यासाठी हि दृकश्राव्य भित्तीपत्रिका अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. तसेच भिंतीवर लावण्यासाठी मोठ्या आकाराचे भित्तीपत्रक आपण विकत घेऊ शकता.

जंगल व माळरानातील पक्षी
ह्या भित्तीपत्रिकेतून जंगलात आणि माळावर आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती देण्यात आली आहे. यातील पक्षी व त्यांची वैशिष्ट्ये तसेच प्रत्येक पक्ष्याच्या आवाजाबद्दल जाणून घेण्यासाठी हि दृकश्राव्य भित्तीपत्रिका अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. तसेच भिंतीवर लावण्यासाठी मोठ्या आकाराचे भित्तीपत्रक आपण विकत घेऊ शकता.

गवताळ प्रदेश आणि शेतजमीनीमधील पक्षी
गवताळ प्रदेश आणि शेतात दिसणाऱ्या पक्ष्यांची माहिती देणारी हि भित्तीपत्रिका आहे. यातील पक्षी व त्यांची वैशिष्ट्ये तसेच प्रत्येक पक्ष्याच्या आवाजाबद्दल जाणून घेण्यासाठी हि दृकश्राव्य भित्तीपत्रिका अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. तसेच भिंतीवर लावण्यासाठी मोठ्या आकाराचे भित्तीपत्रक आपण विकत घेऊ शकता.

मानवी वस्तीच्या भोवतालचे पक्षी
मनुष्यवस्तीच्या आजूबाजूला सहजतेने दिसणाऱ्या पक्ष्यांची ओळख करून देणारी हि भित्तीपत्रिका आहे. यातील पक्षी व त्यांची वैशिष्ट्ये तसेच प्रत्येक पक्ष्याच्या आवाजाबद्दल जाणून घेण्यासाठी हि दृकश्राव्य भित्तीपत्रिका अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. तसेच भिंतीवर लावण्यासाठी मोठ्या आकाराचे भित्तीपत्रक आपण विकत घेऊ शकता.

ठिपके जोडून चित्र तयार करा – बुलबुल
ठिपके जोडून चित्र तयार करा हि क्रिया मुलांना कलेच्या माध्यमातून पक्ष्यांची ओळख करून देते

ठिपके जोडून चित्र तयार करा – खंड्या
ठिपके जोडून चित्र तयार करा हि क्रिया मुलांना कलेच्या माध्यमातून पक्ष्यांची ओळख करून देते